Mumbai Coastal Road Revised Entry Timings, Speed From May 1: धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग अर्थात कोस्टल रोड वर आजपासून प्रवेशाची वेळ, वेगमर्यादेमध्ये बदल; इथे पहा नवे नियम

कोस्टल रोडच्या वेळेमध्ये बदल करण्यासोबतच सिटी ट्राफिक पोलिसांकडून काही वाहनांच्या एट्री वर बंधन आली आहेत.

Mumbai Road | Twitter

मुंबई ट्राफिक पोलिस (Mumbai Traffic Police) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता कोस्टल रोड (Costal Road) वर वाहतूकीच्या वेळेमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. कोस्टल रोड जो धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग म्हणून ओळखला जातो त्याच्या वर वाहतूकीची वेळ आज 1 मे पासून बदलण्यात आली आहे. आता वरळीच्या बिंधू माधव ठाकरे जंक्शन वरून प्रवासाची वेळ सकाळी 8 ते रात्री 5 या वेळेत आठवड्यातील सारे दिवस करता येणार आहे. लोट्स जंक्शन वर रजनी पटेल जंक्शन वरून देखील प्रवेश करता येणार आहे. अमरसन्स गार्डन एंट्री आणि मरीन ड्राईव्हला प्रिन्सेस स्ट्रीट ब्रीज एक्झिट सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत आठवडाभर खुली असेल.

सुरक्षेच्या कारणास्तव या कोस्टल रोड वर वेगवेगळ्या भागात वेगमर्यादेवर देखील बंधनं आहेत, सरळ मार्गावर 80 km/h,बोगद्यामध्ये 60 km/h आणि वळणावर 40 km/h ची मर्यादा आहे.

DCP (South Traffic) Pradnya Jedge यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोड वर काही अपवाद वगळता सारी वाहनं धावू शकातात. मात्र प्रवाशांना या मार्गावर फोटो किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी थांबण्यास मज्जाव आहे.. तसेच या मार्गावर व्हिडिओ शूटिंग देखील बेकायदेशीर आहे. नियमांचं उल्लंघन करणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

कोस्टल रोडच्या वेळेमध्ये बदल करण्यासोबतच सिटी ट्राफिक पोलिसांकडून काही वाहनांच्या एट्री वर बंधन आली आहेत. कोस्टल रोड वर अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर आणि इतर अवजड मालवाहक (बेस्ट किंवा एसटी बसेस आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने वगळून) यांना परवानगी नाही. अपंग व्यक्तींद्वारे वापरल्या जाणाऱ्या दुचाकी, सायकल, मोटारसायकल किंवा स्कूटर (साइडकारसह), तीनचाकी, जनावरांकडून ओढल्या जाणार्‍या गाड्या, टांगा, हातगाड्या आणि पादचारी यांच्यावर निर्बंध लागू आहेत.