Sushant Singh Rajput Case: मुंबईतील वांद्रे पोलिस स्थानकांत माहिती मिळवण्यासाठी पोहचली CBI टीम

तर आज पासून त्यांनी तपासाला सुरूवात देखील केली आहे.

Sushant Singh Rajput CBI Probe | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रामध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येला 2 महिने उलटले तरीही अद्याप त्याच्या इतक्या टोकाचं पाऊल उचलण्यामागील कारण समोर आलेले नाही. दिवसागणिक या प्रकरणामध्ये नवे खुलासे होत असल्याने आता सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआय (Central Bureau of Investigation) कडे सुपूर्त केले आहे. काल (20 ऑगस्ट) दिवशी सीबीआयचं पथक मुंबई मध्ये दाखल झालं आहे. तर आज पासून त्यांनी तपासाला सुरूवात देखील केली आहे. Sushant Singh Rajput Family Statement: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रीया; दोषींना शिक्षा होणार असा व्यक्त केला विश्वास

सीबीआयचं पथक आज सकाळी वांद्रे येथील पोलिस स्थानकामध्ये दाखल झाले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने सारा तपास, चौकशी सीबीआयला देताना राज्य सरकारने आणि मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं असा आदेश दिला आहे. त्यानुसार आता तपासाला सीबीआयकडून सुरूवात झाली आहे.

वांद्रे पोलिस स्थानकांत सीबीआय

ANI Tweet

दरम्यान मुंबईत दाखल झालेल्या सीबीआयचा मुक्काम सांताक्रुझ मध्ये एअरफोर्स ट्रान्सिट मध्ये आहे. आज सकाळी सीबीआय ने एका व्यक्तीला चौकशीसाठी एका गेस्ट हाऊसवर बोलावले होते.

सुशांतसिंग राजपूतने 14 जून दिवशी मुंबईत वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान राजपूत कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे अअरोप करत बिहारच्या पाटनात FIR दाखल केली आहे.