Senate Election Results Celebration at Matoshree: सिनेट निवडणुक निकालानंतर मातोश्रीवर जल्लोष; गुलालात माखले आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे (Watch Video)
त्यानंतर मातोश्री येथे युवा सेनेच्या विजयाचा जल्लोष झाला.
Senate Election Results Celebration at Matoshree: आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये(Senate Election) क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी 10 पैकी 10 जागा जिंकल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला (UBT)या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निर्भेळ यश मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. (हेही वाचा:मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल: आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेची जोरदार मुसंडी )
या विजयानंतर आज मातोश्रीबाहेर गुलाल उधळण्यात आला. शिवसैनिकांनी मातोश्री बंगल्याबाहेर जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवले गेले. गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी गळाभेट घेतली. आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार आहे, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. आदित्य ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना गुलाल लावला.
सिनेट निवडणुक निकालानंतर मातोश्रीवर जल्लोष
आदित्य ठाकरे यांनी उआई रश्मी ठाकरे आणि बाठा गटाचे नेत्यांना गुलाल लावला आणि मिठी मारली. आदित्य आणि तेजस यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरेंनाही कडकडून मिठी मारली आणि या विजयाचं सेलिब्रेशन केलं आहे.