Mumbai Building Collapse: मस्जिद बंदर येथील सय्यद इमारतीचा भाग कोसळला, 2 जणांना बाहेर काढण्यात यश
तर आज मस्जिद बंदर (Masjid Bunder) येथील सय्यद नावाच्या इमारतीचा (Sayyad Building) भाग कोसळला आहे.
मुंबईत (Mumbai) या वर्षात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तर आज मस्जिद बंदर (Masjid Bunder) येथील सय्यद नावाच्या इमारतीचा (Sayyad Building) भाग कोसळ्याची घटना घडली असून मातीच्या ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे.
या दुर्घटनेतून अद्याप 2 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर सय्यद इमारतीचा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर यंदा पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते खचून किंवा इमारतीची भिंत कोसळून पंन्नासपेक्षा अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या प्रकारावर सरकार नेमकी काय कारवाई करणार याची आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तसेच काही दिवासांपूर्वी डोंगरी भागातील एका इमारतीचा भाग कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला होता तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी सुद्धा इमारतीचा कोसळलेला भाग हा म्हाडाचा आहे की महापालिकेचा यावरुन चर्चा रंगली होती. मात्र इमारतीच्या दुर्घटनेत मृ्त्यू किंवा जखमी झालेल्या नागरिकांचे हाल बाजूलाच राहिल्याचे चित्र दिसून आले होते.