Payal Tadvi Suicide Case: नायर हॉस्पिटलमधील कथित रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणातीन तिन्ही सिनियर डॉक्टरांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीचं होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग
या अर्जावर पुढील सुनावणी 30 जुलै दिवशी होणार आहे. या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.
मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील (Nair Hospital) शिकाऊ डॉक्टर पायल तडवीच्या (Payal Tadvi) आत्महत्या आणि रॅगिंग प्रकरणातील आरोपी भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) यांचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालायाने पुढे ढकलली आहे. या अर्जावर पुढील सुनावणी 30 जुलै दिवशी होणार आहे. या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.
पायल तडवीला सतत जातीवाचक शेरेबाजी करून मानसिक त्रास दिला जात होता, तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने पायलने गळफास घेऊस आयुष्य संपवले असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सध्या डॉ. पायल तडवीचं कथित आत्महत्या प्रकरण मुंबई पोलिस गुन्हे शाखा विभागाकडे देण्यात आलं आहे. नुकतेच पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
ANI Tweet
पायल तडवीने लिहिलेली सुसाईट नोट 3 आरोपींनी नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र या सुसाईट नोटचा स्क्रिनशॉट फोनमधून रिकव्हर करण्यात फॉरेंसिक विभागाला यश आले आहे. सुसाईट नोटमध्ये जातीवरुन शेरेबाजी करत असल्याचा उल्लेख केला असून या प्रकरणातील आरोपी सिनियर डॉक्टर्सची नावांचाही खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारत दंड संहितेच्या कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे.