Coronavirus In Mumbai: वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर BMC पुन्हा अॅक्शन मोड मध्ये; चेंबूर मधील Maitri Park Society ला कडक नियमावलीचं पालन करण्याचे आदेश
बीएमसीचे अॅडिशनल म्युनिसिपल कमिशनर सुरेश काकणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिका येत्या काही दिवसात वाढत्या रूग्णसंख्येचा आढावा घेणार आहे.
मुंबई सह महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याने आता नागरिकांसह प्रशासन देखील अलर्ट झाले आहेत. कोरोना संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे बेफिकीर होऊन फिरू नका असे आवाहन करताना मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या भागामध्ये बीएमसीने नियम कडक केले आहेत. या कारवाईमध्ये बीएमसीने चेंबूर भागात निवासी इमारतीमध्ये वाढती रूग्णसंख्या पाहता आता सोसायट्यांना नोटीसी बजावत दक्षता घेण्याचं आवाहन केले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार चेंबूर मध्ये 550 सोसायट्यांना अशाप्रकारे नोटीस देण्यात आली आहे. बीएमसीने मैत्री पार्क भागातील निवासी इमारतींना दिलेल्या नोटिसीमध्ये त्यांच्याकडे बाहेरून येणार्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश आहे. तसेच प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग, क्वारंटाईन नियमावलीचं काटेकोर पालन किमान 14 दिवस करण्याचं आवाहन केले आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या कुटुंबाचे आणि कोरोना लक्षण असणार्यांचे टेस्टिंग, ट्रेसिंग करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Mumbai: नागरिकांनी कोरोनाच्या काळात काळजी घ्यावी अन्यथा दुसरा लॉकडाऊन करावा लागेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन.
बीएमसीचे अॅडिशनल म्युनिसिपल कमिशनर सुरेश काकणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिका येत्या काही दिवसात वाढत्या रूग्णसंख्येचा आढावा घेणार आहे. जर रूग्णसंख्येत वाढ कायम राहिल्यास आणि लोकांनी कोविड नॉर्म्सचं उल्लंघन केल्यास पालिकेला कडक पावलं उचलणं क्रमप्राप्त असेल. त्यामुळे पुढील 10 दिवस काही कडक नियमांची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
ANI Tweet
चेंबूर मध्ये 8-10 दिवसांपूर्वी पर्यंत कोरोना रूग्ण प्रत्येक दिवशी 15 पेक्षा कमी आढळत होते पण आता ही संख्या 25 च्या पार प्रत्येक दिवशी गेली आहे. दरम्यान मुंबईचा कोरोना रूग्ण वाढीचा दर 0.14% पेक्षा जास्त असतना चेंबूर मध्ये तो 0.28 आहे त्यामुळे या भागात प्रशासन अधिक कडक पावलं उचलण्याच्या तयारीमध्ये आहे.