मुंबई महापालिका निवडणूकीसाठी भाजपकडून जोरदार तयारीला सुरुवात, राष्ट्रवादी 60 पेक्षा अधिक जागा मिळवत किंगमेकर ठरेल- शरद पवार
अधिवेशनादरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी असे म्हटले आहे की, मुंबईत 60 पेक्षा अधिक जागी जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. 227 सदस्य असणाऱ्या मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे एकूण 8 सदस्य आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे लक्ष आता मुंबई महापालिकेकडे (Mumbai BMC) लागले आहे. रविवारी मुंबईत राष्ट्रवादीचे अधिवेशन झाले. तसेच येत्या 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने किंगमेकरसाठी तयारी केली आहे. अधिवेशनादरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी असे म्हटले आहे की, मुंबईत 60 पेक्षा अधिक जागी जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. 227 सदस्य असणाऱ्या मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे एकूण 8 सदस्य आहेत.
राष्ट्रवादीने आजवर मुंबई महापालिका निवडणूकीत 227 पैकी 14 जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत एकूण 288 जागांपैकी एकूण 54 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने तीसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते. राष्ट्रवादीच्या या विश्वासावर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी टीका केली आहे. तर राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात महापालिकेत 60 जागा तर कोणी म्हणतो 50 जागांवर विजय मिळवेल. पण 8 नगरसेवक टिकले आहेत हीच मोठी गोष्ट असल्याचे ही आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तर यावेळी भाजप महापालिकेत त्यांचे कमळ फुलवणार असल्याचे ही शेलार यांनी म्हटले आहे.(शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित महापालिकेची निवडणूक लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत)
परंतु आशीष शेलार यांच्या विधानावर गृहनिर्माण मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर पक्षी जास्तच फडफड करत असेल तर समजायचे निशाणा योग्य ठिकाणी लागला आहे. दरम्यान, गेल्या महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेला 84, भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. तर महाराष्ट्रात विधानसभेत शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर आता भाजप मुंबईत महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.