मुंबई: बेस्ट कर्मचा-यांचे 'घरी राहा' आंदोलन अखेर मागे
तर अनेक कर्मचारी दगावले आहेत. अशा कर्मचा-यांच्या मुलांना नोकरी लावण्याचे महाव्यवस्थापकांनी आश्वासन दिले आहे.
कोरोनाचा मुंबईत वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता बेस्ट कर्मचा-यांच्या आरोग्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे बेस्ट (BEST) कर्मचारी 18 मे पासून म्हणजेच आजपासून बेमुदत बंद पुकारणार होते. तसेच आपल्या मागण्याकंडे प्रशासम दुर्लक्ष करत असल्यामुळे 'घरी राहा, सुरक्षित राहा' च्या आधारावर हा बंद पुकारण्यात आला होता. मात्र बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी या कर्मचा-यांशी बातचीत करुन त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्यामुळे बेस्ट कर्मचा-यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. 60% कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याची माहिती महाव्यवस्थापकांनी दिली आहे.
बेस्ट सेवेतील 100 हून अधिक कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक कर्मचारी दगावले आहेत. अशा कर्मचा-यांच्या मुलांना नोकरी लावण्याचे महाव्यवस्थापकांनी आश्वासन दिले आहे. Covid 19 च्या वाढत्या धोक्यात सुरक्षेच्या मागण्या पूर्ण न केल्यास 18 मे पासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा 'Stay at Home' चा इशारा
त्याचबरोबर कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मास्क, ग्लव्ज सारख्या अन्य गोष्टी देण्याचेही महामंडळाने मान्य केले. सद्य परिस्थिती मुंबईकरांची महत्त्वाची सेवा बंद करुन चालणार नाही असे सांगितल्यानंतर सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
सोमवारपासून कर्मचारी संपूर्ण टाळेबंदी पाळून ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करणार असल्याचे समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले होते.
राज्यात कोरोना बाधितांची 33,053 वर पोहोचली आहे. यात काल दिवसभराता राज्यात कोरोनाचे 2,347 रुग्ण आढळले आहेत. तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची एकूण संख्या ही 1,198 वर पोहोचली आहे. तर 7,688 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.