Insurance Company Receives Extortion Email: मुंबईतील विमा कंपनीला मिळाला 3 कोटी रुपयांचा खंडणीचा ईमेल; गोपनीय डेटा लीक करण्याची धमकी

लोअर परळमधील पेनिन्सुला पार्क येथे असलेल्या कंपनीला एका आठवड्यापूर्वी ईमेल मिळाला होता. पाठवणाऱ्याने 4.2 बिटकॉइन (अंदाजे 3 कोटी रुपये) मागितले होते आणि खंडणी न दिल्यास कंपनीचा डेटा सार्वजनिक केला जाईल असा इशारा दिला होता.

Representational Image (Photo Credit: PTI)

Insurance Company Receives Extortion Email: मुंबईतील एका आघाडीच्या विमा कंपनीला (Insurance Company) 3 कोटी रुपयांच्या बिटकॉइनची मागणी करणारा खंडणीचा ईमेल (Extortion Email) आला आहे. खंडणी न दिल्यास कंपनीचा गोपनीय डेटा लीक करण्याची धमकी कंपनीला देण्यात आली आहे. या संदर्भात, एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी सायबर तज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, लोअर परळमधील पेनिन्सुला पार्क येथे असलेल्या कंपनीला एका आठवड्यापूर्वी ईमेल मिळाला होता. पाठवणाऱ्याने 4.2 बिटकॉइन (अंदाजे 3 कोटी रुपये) मागितले होते आणि खंडणी न दिल्यास कंपनीचा डेटा सार्वजनिक केला जाईल असा इशारा दिला होता. या धमकीनंतर कंपनीने अज्ञात ईमेल पाठवणाऱ्या आणि संवेदनशील डेटा लीक करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर, एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी बीएनएस कलम 308(3) आणि 351(2) तसेच आयटी कायद्याच्या कलम 66(अ) आणि 66 अंतर्गत गुन्हा दाखल केला. (हेही वाचा -Akira Ransomware Attack Warning: माहिती चोरणार्‍या नव्या मालवेअर बाबत सरकार कडून अलर्ट जारी)

दरम्यान, कंपनीचे प्रतिनिधित्व करणारे जी. पद्माकर त्रिपाठी यांनी एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली. कंपनीने आधीच अंतर्गत चौकशी केली होती आणि संबंधित माहिती पोलिसांना दिली होती. तपासकर्ते आता ईमेलचे विश्लेषण करत आहेत आणि पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ञांशी संपर्कात आहेत. (हेही वाचा -Mumbai Extortion Case: चित्रपट निर्मात्याला 2.65 कोटी रुपयांचा लावला गंडा, लेखक Mahesh Pandey यांना अटक)

तथापि, आरोपीला कंपनीच्या गोपनीय डेटाची माहिती असल्याने अधिकारी पीडित कंपनीतील कोणत्याही आतल्या व्यक्तींच्या सहभाग आहे की नाही याचा देखील तपासणी करत आहेत. याप्रकरणी सायबर गुन्हे पथक सक्रियपणे सुगावा शोधत असून लवकरच या प्रकरणात पुढील घडामोडी अपेक्षित आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement