BARC Scientist Dies By Suicide: बीएआरसी शास्त्रज्ञाची गळफास लावून आत्महत्या, कारण अस्पष्ट

भाभा अणुसंशोधन केंद्रातील (Bhabha Atomic Research Centre) एका शास्त्रज्ञाने आत्महत्या (Scientist Dies By Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Image used for Representational Purpose only (Photo Credits: PTI)

मुंबईच्या (Mumbai) मानखुर्द (Mankhurd) परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रातील (Bhabha Atomic Research Centre) एका शास्त्रज्ञाने आत्महत्या (Scientist Dies By Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी घडली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिसांना मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

चंपालाल प्रजापत (वय, 45) हे मूळचे राजस्थानमधील सुजानगढचे रहिवासी होते आणि सुपरकंडक्टर्समध्ये तज्ञ होते. प्रजापत हे गणेश चतुर्थीच्या दिवशी तांत्रिक भौतिकशास्त्र विभागाचा समावेश असलेल्या आगामी परिसंवादाचे सचिव होते. यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी सुट्टी असतानाही त्यांना कामावर बोलवण्यात आले होते. याच दिवशी प्रजापती यांनी संध्याकाळी 5.08 मिनिटांनी आपल्या पत्नीला फोन केला. तसेच 5.30 वाजेपर्यंत घरी पोहचेल असे सांगितले होते. परंतु, प्रजापती घरी न आल्याने त्यांच्या एका मित्राला त्याला शोधण्याची विनंती करण्यात आली. दरम्यान, संध्याकाळी 7 वाजता हीलियम प्लांटमध्ये प्रजापती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे देखील वाचा- Mumbai: गोवंडीत गॅस सिलिंडर परवानगी शिवाय भरणाऱ्या 5 जणांना पोलिसांकडून अटक

या घटनेची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. त्यांनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी प्रजापती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात प्रजापती यांनी आत्महत्या केल्याची निष्पन्न झाले, असे वरिष्ठ निरीक्षक सिद्धेश्वर म्हणाले आहेत. तसेच प्रजापती हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असून त्यांच्यावर बीएआरसी रुग्णालयातच उपचार सुरु होते, असेही गोवे यांनी म्हटले आहे.

जानेवारीमध्ये, बीएआरसीच्या बायोकेम विभागात कार्यरत शास्त्रज्ञ अनुज त्रिपाठी (37) यांचा त्यांच्या पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif