मुंबई: रिक्षा प्रवासादरम्यान विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करणार्या चालकाला Mumbai Police कडून अटक; शहर सुरक्षित ठेवण्यासाठी तक्रार नोंदवण्याचं पोलिसांचं आवाहन
दरम्यान यावेळेस मुंबई सीपीच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील असल्या घटनांबद्दल तक्रार करावी असे मी आवाहन करतो. अशा प्रकारचे ट्वीट करण्यात आले आहे.
मुंबईसह देशभरामध्ये सध्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र महिलांनी अन्याय सहन न करता वेळीच त्याविरोधात आवाज उठवला तर दोषींना वेळीच वठणीवर आणता येणार आहे. दरम्यान असाच एक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. गोरेगाव परिसरात रिक्षा चालकाने कॉलेजला जाणार्या तरूणीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या मुलीने प्रसंगावधान राखत मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागून रिक्षा चालकाला अटक करण्यात मदत केली आहे. मुंबई पोलिसांनी देखील ट्विट करत या घटनेची माहिती देत मुंबई पोलिस महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान यावेळेस मुंबई सीपीच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील असल्या घटनांबद्दल तक्रार करावी असे मी आवाहन करतो. अशा प्रकारचे ट्वीट करण्यात आले आहे.
पीडीत तरूणीने केलेल्या ट्वीटनुसार सकाळी 7.30 च्या सुमारास ती नेहमीप्रमाणे रिक्षाने गोरेगाव वरून मालाडच्या दिशेने निघाली. दरम्यान ट्राफिकमध्ये अडकणे टाळण्यासाठी रिक्षाचालकाने गल्लीबोळ्यांचा मार्ग निवडला. मात्र यावेळेस तो हस्तमैथून करत करत होता. सातत्याने रिअर व्ह्यू मिररच्या माध्यमातून मागे पाहत होता. सुरूवातीला तरूणीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले मात्र थोड्याच वेळात तो रिक्षाचालक गैरवर्तन करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडे मदत मागितली. दरम्यान तिच्या सुरक्षेसाठी तिने गर्दीचं ठिकाण पाहून तिने मध्येच बहाणा काढत रिक्षाप्रवास अर्धवट सोडला. मुंबई पोलिसांनीदेखील पीडितेच्या व्हिडिओ शूटच्या माध्यमातून संबंधित गुन्हेगाराला तातडीने अटक केली आहे. बोगस, मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई; रिक्षा प्रवासाच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जारी.
मुंबई पोलिस ट्वीट
मुंबई सारख्या कॉस्मोपोलिटन शहरामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. संजय बर्वे यांच्यानंतर रविवार (1 मार्च ) दिवशी मुंबई पोलिस आयुक्तपदी विराजमान झालेल्या परबीर सिंह यांनी देखील आमच्यासाठी महिला सुरक्षा हा विषय प्राथमिकता असेल. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार आता 24 तास मुंबई महिलांसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.