मुंबई: मुकेश अंबानी यांच्या Antilia जवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार, बॉम्ब शोधक-विनाशक पथाकडून अधिक तपास सुरु (Video)
तर कारमध्ये स्फोटक असल्याचे समोर आल्याची माहिती दिली जात आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अॅन्टेलिया (Antilia) या निवासस्थानी आज संध्याकाळी एक संशयास्पद हिरव्या रंगाची कार आढळल्याने खळबळ उडाली. तर कारमध्ये स्फोटक असल्याचे समोर आल्याची माहिती दिली जात आहे. तर अँन्टेलियाजवळ उभ्या असलेल्या या कारमध्ये जिलेटिनचा साठा आढळल्याची माहिती ABP माझा यांनी दिली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक-विनाशक पथकाकडून अधिक तपास केला जात आहे.
कारमध्ये सापडलेल्या स्फोटकांसह एक चिठ्ठी सुद्धा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक दाखल झाले आहे. तर पोलिसांकडून परिसरात असलेल्या सीसीटीव्ही मधील फुटेज तपासून पाहिले जात आहे. अॅन्टेलियाजवळ हिरव्या रंगाची संशयास्पद कार दिसल्यानंतर अंबानी यांच्या सिक्युरिटीकडून त्याची माहिती पोलिसांनी दिली गेली. त्यानुसार घटनास्थळी त्यांनी धाव घेतली असून या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून सुद्धा अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणी अधिक माहिती लवकरच समोर येईल असे सांगितले जात आहे.
Tweet:
Tweet:
या प्रकरणी गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी असे म्हटले आहे की, जिलेटिनच्या काड्या कारमधून बाहेर काढण्यात आल्या आहेत. तसेच अधिकाऱ्यांसह या ठिकाणी पोलिसांनी परिसराला घेराव घातला. तसेच मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही असे शंभुराजे देसाई यांनी म्हटले आहे. अद्याप तपास सुरु असल्याने कोणतीही विधान करणे योग्य ठरणार नाही.