Mumbai Crime: ओशिवरा परिसरात इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये आढळला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय
या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील (Mumbai Crime) ओशिवरा परिसरात इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये (Safety Tank) एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसव्हीएस रोड जोगेश्वरी येथील प्लॉट नंबर 4 मध्ये पोलिसांना या व्यक्तीचा मृतदेह आढळला. या इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अद्याप तरी या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृत्यू झालेली ही व्यक्ती अंदाजे 40 ते 50 वर्षांची असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Thane: ठाण्यातील तीन हात नाक्यावरील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; 13 जणांना अटक)
दरम्यान सेफ्टी टँकमध्ये मृतदेह टाकून पुरावे नष्ट करण्याचा उद्देश असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सध्या त्याच मार्गाने तपास सुरु केला आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी जरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जरी असला तरी लवकरच मारेकरी सापडला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील तपासात पोलिसांच्या हाती काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

