Mumbai Air Quality Index: सलग दहाव्या दिवशीही मुंबईची हवा खराब, गुणवत्ता निर्देशांक 300 पार

मात्र, मागच्या काही दिवसांपासून मुंबई शहराचाही क्रमांक वायुप्रदुषणात येताना दिसतो आहे. मुंबई शहरातील हवा पाठिमागील 10 दिवसांपासून अत्यंत वाईट स्थतीत पोहोचली आहे. मुंबईतील हवेचा निर्देशांक 300 पार गेला आहे.

Air Pollution Mumbai | (Photo Credits: Pixabay, Archived, edited, symbolic images)

Mumbai Air Quality Index: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई हे शहर वायुप्रदुषणामुळे (Mumbai Pollution) पाठिमागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरे तर राजधानी दिल्ली हे शहर देशातील सर्वात प्रदुषीत शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, मागच्या काही दिवसांपासून मुंबई शहराचाही क्रमांक वायुप्रदुषणात येताना दिसतो आहे. मुंबई शहरातील हवा पाठिमागील 10 दिवसांपासून अत्यंत वाईट स्थतीत पोहोचली आहे. मुंबईतील हवेचा निर्देशांक 300 पार गेला आहे. मंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) सर्वाधिक 319 इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनविकाराच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांमध्ये श्वसनविकार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. प्रामुख्याने सर्दी, खोकला, घसादुखी, याशिवाय घसा खवखवणे अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने वायुप्रदुषणाचा धोका ओळखून मुंबई शहराबाबत उपाययोजना कराव्यात. प्रामुख्याने वायुप्रदुषणाशी संबंधीत महत्त्वाच्या घटकांबद्दल विशेष काळजी घेऊन त्याचे निवारण करण्यावर भर द्यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. (हेही वाचा, Mumbai Air Quality index: प्रदुषणात मोठी वाढ, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, दिल्लीपेक्षाही ढासळली; नागरिकांना श्वसनाशी संबंधीत विकार)

मुंबई शहर आणि उपनगरांतील हवेचा निर्देशांक

हवेच्या निर्देशांकाची नोंद (319) पाहता मुंबईत तो धोकादायक पातळीवर गेला आहे. मुंबई पाठोपाठ दिल्लीतही हवेचा निर्देशांक 308 च्या वर पोहोचला आहे. नवी मुंबई आणि मुंबईतील चेंबुर परिसरातील हवेचा निर्देशांक सर्वाधिक धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले जात आहे.