IPL Auction 2025 Live

Mumbai Air Quality index: प्रदुषणात मोठी वाढ, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, दिल्लीपेक्षाही ढासळली; नागरिकांना श्वसनाशी संबंधीत विकार

मुंबईतही थंडी वाढली आहे. दरम्यान, वायुप्रदुषणातही वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता (Mumbai Air Quality index) प्रचंड घसरली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाशी संबंधीत विकारांना सामोरे जावे लागत आहे.

Air Pollution | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पाठिमागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रदुषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याची परिणीती इतकी भयंकर झाली आहे की, वायूप्रदुषणाच्या बाबतीत मुंबईने आता राजधानी दिल्लीची बरोबरी केली आहे. महाराष्ट्रात तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यभरात थंडीची कडाका जाणवतो आहे. मुंबईतही थंडी वाढली आहे. दरम्यान, वायुप्रदुषणातही वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता (Mumbai Air Quality index) प्रचंड घसरली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाशी संबंधीत विकारांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील तापमानाबाबत बोलायचे तर ते 13.08 अंशावर गेले आहे. तर हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 322 वर गेला आहे.

वायुप्रदुषणामुळे घसरलेल्या हवेच्या गुणवत्तेत भारतामध्ये दिल्ली अग्रेसर होती. दिल्लीत प्रचंड प्रदुषण असल्याने हवेची पातळी कामालीची घसरली होती. दिल्लीच्या हवेतील गुणवत्तेबाबत बोलायचे तर दिल्लीचा हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक हा 221 इतका पाहायला मिळाला आहे. पण, आता त्या तुलने मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक कमालीचा घसरला आहे. तो चक्क 322 इतका झाला आहे. सफरने याबाबत नोंद दर्शवली आहे. (हेही वाचा, Air Quality In Mumbai: मुंबईचा AQI दिल्लीपेक्षा खाली घसरल्याने मास्क वापरण्याचे डॉक्टरांनी केले आवाहन)

मुंबई हे जागतिक शहर आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीची दखल घेतली जाते. सहाजिकच हवेच्या गुणवत्तेबाबतही मुंबईचा विचार केला जातो. पाठिमागील काही दिवसांपासून मुंबईची हवा जोरदार चर्चेत आहे. मुंबईच्या हवेची चर्चा राज्याच्या विधिमंडळापर्यंतही पोहोचली होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. यापुढेही ते प्रयत्न केले जातील अशी शासनाची भूमिका राहिलीआहे. दरम्यान, मुंबईतील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईत वेगवेगळ्या 14 ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी केंद्रं उभारण्यात आली आहेत. त्यातील तीन कार्यन्वीत होण्याच्या टप्प्यात आली आहेत.