आदित्य ठाकरे आगामी लोकसभा निवडणुक लढवणार?

निवडणुक आयोगाने (Election Comission) नुकत्याच आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) तारखा जाहीर केल्या आहेत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

शिवसेना (Shiv Sena) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)लोकसभा निवडणुक लढणवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तसेच ठाकरे घराण्याची परंपरा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोडीत येणार का याबद्दलही प्रश्न उपस्थित राहू लागले आहेत. निवडणुक आयोगाने (Election Comission) नुकत्याच आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच रविवार पासूनच आचारसंहितासुद्धा लागू करण्यात आली आहे. तर राजकीय पक्षांतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच तयारी सुरु झाली होती.

उत्तर-मध्य मुंबई येथून आदित्य ठाकरे निवडणुक लढवू शकतात असे एका विश्वासनीय सूत्राकडून देण्यात आली आहे. तसेच भाजप (BJP) पक्षातील खासदार पुनम महाजन (Poonam Mahajan) यांनासुद्धा पुन्हा निवडणुक लढवायची आहे. तर रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीसुद्धा हा मतदारसंघ स्वत:साठी मागितला आहे. त्याचसोबत आदित्य ठाकरे यांनी उत्तर-मध्य मुंबई येथून निवडणुक लढवावी असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. तर पश्चिम मतदार संघ हा शिवसेना असल्याने त्या ठिकाणी गजानन किर्तीकर हे लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांनी ही निवडणुक लढावी असे म्हटले जात आहे.(हेही वाचा-लोकसभा निवडणूक 2019: मावळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार रिंगणात; शरद पवार यांनी दिले संकेत)

तर येत्या आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना रिंगणात उतरवणार का याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच निवडणुकीच्या राजकरणापासून मी कधी दूर राहीलो नाही आणि गरज पडल्यास निवडणुक लढवणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.