Mumbai: मुंबई येथील महालक्ष्मी परिसरातील नवासी इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
महालक्ष्मी परिसरात विठ्ठल निवास ही इमारत आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान आणि पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुंबई (Mumbai) येथील महालक्ष्मी (Mahalakshmi) परिसरातील नवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. महालक्ष्मी परिसरात विठ्ठल निवास ही इमारत आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान आणि पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गरज पडल्यास अग्निशमन दलाच्या आणखीही गाड्या बोलावल्या जाऊ शकतात.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, आग लागल्याचे लक्षात येताच विठ्ठल निवास इमारतीतील आणि या इमारतीच्या आजूबाजूच्या इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. दुपारच्या वेळ असल्याने नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जीवीत हानीचे वृत्त नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणावह होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Viral Video: इमारतीला लागली भीषण आग, तरुणांनी जीवावर खेळून वाचवले वृद्धाचे प्राण; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ,Watch)
मुंबईत नेहमीच आगीच्या घटना घडतात. मुंबईतील अनेक ठिकाणे ही अत्यंत दाटीवाटीची असतात. त्यामुळे अशा वेळी जर आगीची घटना घडली तर मदत आणि बचाव कार्यास अधिक विलंब होतो. त्यामुळे अनेकदा मोठी हानी होत असते.