मुंबई: भांडुप येथे 22 वर्षीय तरुणाचा विहार तलावात बुडून मृत्यू
याबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले आहे. तसेच नागरिकांना पावसाच्या काळात समुद्रकिनाऱ्यासह तलावांकडे जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान, आता भांडुप (Bhandup) पश्चिम येथे एक 22 वर्षीय तरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. याबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
प्रभु किसन भोई असे तरुणाचे नाव आहे. सदर तरुण विहार तलावाकडे गेला असता तेथे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यापूर्वी सुद्धा समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी भांडुप येथेच भांडुपेश्वर कुंड येथेबुडाल्याची घटना समोर आली होती. तर मे महिन्यात सुद्धा शिवाजी तलावात 15 वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी तलावातील कारंजामुळे विजेचा झटका बसल्याची शक्यता त्यावेळी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली होती.(नालासोपारा: धानीव परिसरातील वाकणपाडा येथील तलावात बुडून दोघांचा मृत्यू)
तर काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यतील जव्हार मधील अंबिक चौकाच्या येथे राहणारे 13 जण कालमांडवी धबधब्याजवळ अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी पावसाच्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा त्यांना अंदाज न आल्याने अंघोळ करण्याच्या नादात खोल पाण्यात गेल्याचे समजले नाही. यामधील 5 जणांना पोहता न आल्याने ते धबधब्यत बुडाल्याची माहिती देण्यात आली होती.