नालासोपारा: इमारतीच्या 4 थ्या मजल्यावरुन पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी नालासोपारा येथे घडली.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (11 एप्रिल) नालासोपारा येथे घडली. रेहान खान असे या मृत बालकाचे नाव आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर मधील जीवदानी अमन अपार्टमेंटमधील आपल्या घरात रेहान खेळत होता. खिडकीला ग्रील नसल्याने खिडकीतून डोकावत असताना त्याला तोल गेला आणि तो खाली पडला. या दृर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. ओरडण्याच्या आवाजाने स्वयंपाकघरात काम करत असलेली त्याची आई बाहेर आली. तिनं बाहेर येऊन पाहिलं असताना रेहान खाली पडला होता आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. मुंबई: वसई-विरार महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा मृत्यू; प्रशिक्षकासह चार जण अटकेत
त्यानंतर रेहानला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे वडील कमरुद्दीन हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. आर्थिक अडचणीमुळे त्यांना ग्रील लावण्यास विलंब होत होता. मात्र त्यामुळे एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.
याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून लहान मुलांची विशेष काळजी, खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2019 01:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

