मालाड येथील मढ जेट्टी समुद्रात बोट बुडाल्यानंतर 4 जणांना वाचवण्यात यश तर 3 जण अद्याप बेपत्ता

या प्रकरणी बोटीमध्ये असलेल्या नागरिकांपैकी 4 जणांचा वाचवण्यात यश आले आहे. तर अद्याप 3 जण बेपत्ता आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील (Mumbai) मलाड पश्चिमेला असणाऱ्या मढ जेट्टी (Madh Jetty) येथे आज (15 एप्रिल) दुपारी 1.30 वाजल्याच्या सुमारास बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोटीमध्ये असलेल्या नागरिकांपैकी 4 जणांचा वाचवण्यात यश आले आहे. तर अद्याप 3 जण बेपत्ता आहेत. शोध आणि बचाव कार्य आता अग्निशमन दलाकडून थांबवण्यात आले आहे. मात्र हे प्रकरण आता पोलिसांच्या हातात देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका लहान मच्छीमारीच्या बोटीतून सात जण गेले होते. त्यावेळी वर्सोवा येथून मढ जेट्टी येथे जात होते. यावेळी बोट उलटल्याने सात पैकी चार जणांनी समुद्रातून पोहत किनाऱ्यावर आले.

वरिष्ठ निरिक्षक जगदेव कालापडे, मालवणी पोलीस स्थानक यांनी असे सांगितले आहे की, सध्या बचावकार्य अग्निशमन दल आणि कोस्टल पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. (अलिबाग: गेट वे ऑफ इंडिया हुन 88 प्रवाशांना घेऊन निघालेली बोट बुडाली; जीवितहानी टळली) 

तसेच सुक्या मच्छीच्या फॅक्टीरत काम करणाऱ्या पाच जणांची ती बोट ढोली पाडा येथे आणल्यानंतर तेथील नागरिकांनी घटनस्थळी गर्दी केली. ही बोट मच्छीमार याची असून नरेश कोळी असे त्याचे नाव आहे. नरेश हा वर्सोवा येथे राहणारा असून त्याच्यासोबत अन्य काहीजण सुद्धा होते असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येणार असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे आमचे कर्तव्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या 7-8 वर्षापासून वर्सोवा येथे राहणारे कामगार फॅक्टरीत जाण्यासाठी समुद्रामार्गे मढ जेट्टीचा उपयोग करतात.