Mumbai: अल्पवयीन विद्यार्थिनीचा शालेय स्वच्छतागृहात लैंगिक छळ, 35 वर्षीय शिपायास अटक; मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील नामांकीत शाळेतील घटना
शाळेच्या स्वच्छतागृहात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीने (नाव लपविले आहे) विद्यार्थीनीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिच्याशी जुलै महिन्यापासून लगट करुन लैंगिक छळ (Sexual Harassment) करण्यास सुरुवात केली.
मुंबईतील ग्रँट रोड (Grant Road ) परिसरातून एका नामांकित शाळेच्या ३५ वर्षीय शिपायाला गावदेवी पोलिसांनी अटक (Peon Arrested) केली आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीने (नाव लपविले आहे) विद्यार्थीनीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिच्याशी जुलै महिन्यापासून लगट करुन लैंगिक छळ (Sexual Harassment) करण्यास सुरुवात केली. तसेच, घडला प्रकार कोणास सांगितला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने तिला दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार येथील रहिवासी असलेल्या आरोपीने आधी पीडितेशी (विद्यार्थीनी) मैत्री केली आणि नंतर तिचा लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. तो तिला शाळेच्या स्वच्छतागृहात घेऊन जायचा आणि तिथे तिच्यावर अत्याचार करायचा. आरोपीने घडल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने या प्रकाराची प्रदीर्घ काळ वाच्यताच केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अलिकडे ती गप्प गप्प राहात असे. त्यातच एकदा तिला रडताना तिच्या आईने पाहिले. त्यामुळे आईला तिचा संशय आला. तिने आपल्या मुलीला विश्वासात घेतले. तेव्हाच मुलीने तिचा त्रास सांगितला. त्यानंतर तिच्या आईने शाळा प्रशासनाला माहिती दिली आणि पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून गवदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावली. आरोपीने तिचा नंबर देखील घेतला होता आणि तिला व्हिडीओ कॉल केला होता. त्याने तिला मोबाईल कपडे समोर उतरवण्यास सांगितले होते, असा त्याच्यावर आरोप आहे. (हेही वाचा, Sexual Harassment: टेस्लाचे सीईओ Elon Musk यांनी फेटाळले लैंगिक छळाचे आरोप; जाणून घ्या काय आहे प्रकरण)
गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दत्ताराम गिरप यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आम्ही आरोपीला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता त्याला 14 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनान्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यावर 354 (कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे), भारतीय दंड संहिता (IPC) 354 A (लैंगिक छळ), कलम 8, कलम 354 डी (पाठलाग) या आरोपांवरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वयेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने अशाच प्रकारे शाळेतील अन्य मुलीवर अत्याचार केले होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.