Mumbai: मोबाईल चोरी पकडल्याने स्थानिकांकडून झालेल्या बेदम मारहाणीत 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; 6 जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात एका 30 वर्षीय व्यक्तीचा स्थानिकांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मोबाईल चोरताना ही व्यक्ती पकडली गेली त्यानंतर स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला

Mumbai: मोबाईल चोरी पकडल्याने स्थानिकांकडून झालेल्या बेदम मारहाणीत 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; 6 जण पोलिसांच्या ताब्यात
Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

मुंबईच्या (Mumbai) सांताक्रूझ (Santacruze) परिसरात एका 30 वर्षीय व्यक्तीचा स्थानिकांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मोबाईल चोरताना ही व्यक्ती पकडली गेली त्यानंतर स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. साईजाद खान (Saijjad Khan) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सांताक्रुझ मधील मुक्तानंद पार्क येथे 25 डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सांताक्रूझ पोलिसांनी (Santacruz Police) दिली आहे.

मुक्तानंद पार्क मधील कन्स्ट्रक्शन साईटवर एका मजूराचा मोबाईल चोरताना खान याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत खान एका रिक्षेत झोपला. सकाळी रिक्षाचालक येताच त्याने खानला पाहिले आणि बांद्रा येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

ANI Tweet:

दरम्यान, खानचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एबीपी च्या रिपोर्टनुसार, अजून इतर 4-5 चोरीच्या प्रकरणात खान गुन्हेगार होता. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या 6 जणांवर भारतीय दंड कलम 302, 342 आणि 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंधेरी मध्ये मोबाईल चोरीसाठी एका व्यक्तीला लोकल बाहेर खेचण्यात आले. यात प्रवासी व्यक्ती जखमी झाला. या घटनांमुळे लोकलच्या दरवाज्यावर उभे न राहणे, मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन लोकल प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2020 01:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).