Kurla Wall Collapsed: कुर्ला येथे इमारतीची भिंत चाळीवर कोसळली, घटनेत १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Kurla Wall Collapsed: कुर्ला येथे इमारतीची भिंत चाळीवर कोसळली, घटनेत १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू
Dead-pixabay

Kurla Wall Collapsed: मुंबईतील कुर्ला (Kurla) परिसरात सोमवारी सकाळी 8 वाजता ग्राउंड प्लस टू इमारतीची कंपाऊड भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 वर्षाच्या तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कुर्ल्यातील सुभाष नगर येथील घटना आहे. या घटने नंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी परिसरातील स्थिती पाहण्यासाठी दाखल झाले. या घटनेमुळे तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कुर्ल्यातील सुभाष नगर येथील ग्राऊंड प्लस टू इमारतीची कंपाऊंड भिंत कोसळली. या घटनेत १८ वर्षीय तरुणीवर मोठी भिंत कोसळली.  वैष्णवी प्रजापती असे या तरुणीची नाव होते. वैष्णवी सकाळी घरात एकटी होती त्यामुळे या घटनेतील मोठी जीवीतहानी टळली. मोठीच्या मोठी भिंत वैष्णवीच्या घरात येवून पडली. या घटनेत ती संपुर्ण जखमी झाली.  स्थानिकांच्या मदतीने तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीला भाभा रुग्णालयात दाखल केल्या नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटने नंतर मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी पाहणी केली. त्याच बरोबर भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठं भीतिचं वातावरण निर्माण झाल.