मुंबई: मुलांच्या शाळेची फी मागणे एका महिलेच्या जीवावर बेतले
मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसै मागणाऱ्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना मुंबई येथील एका परिसरात घडली. माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीनेच तिचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कादेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसै मागणाऱ्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना मुंबई (mumbai) येथील एका परिसरात घडली. माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीनेच तिचा खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कादेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पुजा गौड (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. पुजा ही उन्नत नगर (unnat nagar) येथील रहिवासी होती. मुलांच्या शाळेतील फी भरण्यासाठी पैसे द्या, अशी पुजाने आरोपीकडे मागणी केली . मात्र, त्यावेळी आरोपीने साफ नकार दिला. परंतु, पुजा हिने पुन्हा पैसे मागितल्यानंतर आरोपी संतापला आणि रागाच्या भरात आणि त्याने पुजाचा खून केला.
त्यानंतर आरोपीने स्थानिक पोलिसांना फोनवरुन आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा पुजाचा मृतदेह हा पंखेला अडकलेला आढळला. आपल्या पत्नीने गळफास घेतल्याचे सांगून आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पुजाच्या पतीनेच तिचा खून केल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आपणच पुजाचा खून केला असल्याचे आरोपीने कबूल केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)