Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये CM Eknath Shinde यांनी केली महत्त्वाच्या बदलांची घोषणा

कमीतकमी 3.50 कोटी महिलांना या योजनेचा फायदा होण्याची आशा आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मध्ये सरकारकडून आता दोन बदलांची घोषणा करण्यात आली आहे. आज विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही अटी आणि शर्थींमुळे सर्व महिला योजनेत सहभागी होऊ शकत नव्हत्या म्हणून दोन बाबतीत शिथिलता देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी मांडलेल्या राज्याच्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मधील 2 बदलांची

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये वयो मर्यादा वाढवण्यात आली आहे. 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांऐवजी आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना देखील या योजनेपासून दूर ठेवले जाणार होते पण आता ती जमीनीची अट देखील शिथिल झाली आहे. Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून.

1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना या योजनेचा फायदा होण्याची आशा आहे. पात्र महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.