MU's IDOL Final Year Exams 2020: मुंबई विद्यापीठात आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवर 'Cyber Attack'; 6-7 ऑक्टोबरचे पेपर रद्द

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या एक्झाम सर्व्हर वर काल सायबर हल्ला झाल्यानंतर 6,7 ऑक्टोबरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

File Photo of Mumbai University, (Photo Credit: Facebook Page)

मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) दूर आणि मुक्त अध्ययन संस्था (Institute of Open and Distance Learning)च्या परिक्षांच्या गोंधळ आजही कायम आहे. आयडॉलच्या एक्झाम सर्व्हर वर काल (6 ऑक्टोबर) सायबर हल्ला झाल्यानंतर कालच्या आणि आजच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या आर्ट्स, कॉमर्स शाखेच्या परीक्षा अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये नव्या तारखा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सांगितल्या नसल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. Mumbai University IDOL Exams 2020: मुंबई विद्यापीठ 'आयडॉल' अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा पुढे ढकलल्या.

काल (6 ऑक्टोबर) दिवशी आर्ट्स आणि कॉमर्स शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांना लॉगिंग करण्यामध्ये अडचण येत होती. युनिव्हर्सिटी कडून देण्यात आलेल्या एक्झाम लिंकवर 'No exams scheduled'असा मेसेज फ्लॅश होत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी काल परीक्षा देऊ शकलेले नाहीत. आजही असाच गोंधळ आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाने हा सायबर हल्ला असल्याचं सांगत याबाबतची तक्रार सायबर सेल कडे करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

आज BSc-IT, BSc-computer science, MCA सोबतच BA, BCom च्या एटीकेटीच्या परीक्षा नियोजित होत्या. मात्र आता या सार्‍या गडबडण्याची शक्यता आहे. कालच्या परीक्षा रद्द झाल्या असून आजही परीक्षा रद्द झाल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान विद्यापीठाकडून अधिकृत संकेतस्थळावर त्याच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं  सांगण्यात आलं आहे.

मुंबई युनिव्हर्सिटी दरवर्षी एमकेसीएल कडून ऑनलाईन मदत घेते त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन सर्व्हिस देते मात्र यंदा त्यांनी सिंगापुरच्या edtech firm, Littlemore Innovation Labs (LMI)च्या मदतीने परीक्षा घेतल्या आहेत. Mumbai University College Teachers' Association कडून या प्रकाराबाबत उच्च स्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी समोर येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now