MSRTC Workers Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्यासाठी आज मुदतीचा शेवटचा दिवस, उद्यापासून थेट कारवाईला सुरुवात

त्यामळे आज जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांना सेवेत पूर्ववत रुजू करुन घेतले जाईल. जे होणार नाहीत त्यांच्यावर उद्यापासून म्हणजेच 24 डिसेंबरपासून एसटी प्रशासनाकडून (MSRTC) थेट कारवाई केली जाणार आहे.

MSRTC Employees | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

संपावर (MSRTC Workers Strike) असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत परत रुजू होण्यासाठी दिलेली मुदत आज (23 डिसेंबर) संपत आहे. त्यामळे आज जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांना सेवेत पूर्ववत रुजू करुन घेतले जाईल. जे होणार नाहीत त्यांच्यावर उद्यापासून म्हणजेच 24 डिसेंबरपासून एसटी प्रशासनाकडून (MSRTC) थेट कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला ही कारवाई निलंबनाची असेल त्यानंतर पुढील करवाईस सुरुवात होईल, अशी माहीत सूत्रांनी दिली आहे. पगारवाढ, वेळेत पगार करणे आणि राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation राज्य सरकारमध्ये विलीन करणे यासह इतर विविध मागण्यांसाठी पाठीमागील एक महिन्याहून अधिक काळत एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर हजर राहावे अशी सरकारची भूमिका आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

विलिनीकरणाची मागणी वगळता एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. विलीनिकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत काही काळ वाट पाहावी लागणार आहे. समितीचा जो निर्णय येईल तो राज्य सरकारला मान्य असेल, असे राज्य सरकारने आगोदरच स्पष्ट केले आहे. तरीही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारने येत्या 23 डिसेंबर पर्यंत सेवेत हजर होण्याची कर्मचाऱ्यांना शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे जे कर्मचारी सेवेत आज रुजू होती त्यांना सेवेत पुन्हा सेवेत सामावून घेतले जाईल. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे. (हेही वाचा, MSRTC Strike: एसटी कर्मचारी संप, राज्य सरकार आक्रमक; मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा)

राज्य सरकारच्या अवाहनाला प्रतिसाद देत अनेक कर्मचारी सेवेत हजर झाले आहे. मात्र, काही कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असून, जोपर्यंत एसटीचे सरकारमध्ये विलीनिकरण होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असे म्हटले आहे.