MSRTC Workers Strike: एसटी कर्मचारी संप, शिवशाही बस दोन्ही सुरु, आंदोलनाचे पुढे काय होणार याबाबत उत्सुकता
सांगली पुणे मार्गावर ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. इतरही मार्गांवर लवकरच शिवशाही बस सेवा सुरु केली जाणील असे आगार प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संप (ST Workers Strike Continues) आणि शिवशाही बस सेवा अशा दोन्ही गोष्टी सुरु राहणार आहेत असे दिसते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी केलेला संप MSRTC Workers Strike आज (12 नोव्हेंबर) सुद्धा सुरु आहे. कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. हा संप इतक्यात मिटण्याची तर चिन्हे दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे अवाहन करतानाच संप मोडीत काढण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे एमएसआरटीसी (MSRTC ) ने अनेक बस स्थानकांवर शिवशाही बस (Shivshahi Bus) सेवा सुरु केली आहे. सांगली पुणे मार्गावर ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. इतरही मार्गांवर लवकरच शिवशाही बस सेवा सुरु केली जाणील असे आगार प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संप (ST Workers Strike Continues) आणि शिवशाही बस सेवा अशा दोन्ही गोष्टी सुरु राहणार आहेत असे दिसते. यात आंदोलनाचे काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
संपावर असलेल्या एसटी कामगारांनी कामावर परतावे यासाठी राज्य सरकार वारंवार प्रयत्न करत आहे. अनेक विनंत्या करुनही कर्मचारी संपावर येत नसल्याचे पाहून राज्य सरकारने आता खासगी बस वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक पुणे आणि सांगली आगारातून शिवशाही बस वाहतूक सुरु करणयात आली. सांगली-पुणे मार्गावरील शिवशाही बस सेवेप्रमाणेच इतर ठिकाणीही सेवा सुरु केली जाईल अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. काही ठिकाणी घडलेल्या किरकोळ घटना विचारात घेता बस सेवेला आंदोलकांचा अटकाव होऊ नये, यासाठी सांगली आगारात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (हेही वाचा, ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, 250 बस डेपो बंद, 918 कर्मचारी निलंबित)
राज्य सरकारने खासगी शिवशाही सुरु केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. आमचा कोणताच कर्मचारी कामावर रुजू झाला नाही. आमचा संप कायम सुरु आहे. त्यामुळे हा संप मोडून काढण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले आहे. त्यामुळेच शिवशाही ही खासगी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिकाही काही आंदोलक कर्मचारी घेत आहेत.