MSRTC प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता BHIM App द्वारे करता येणार NCMC कार्ड टॉप-अप

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे. आता NCMC कार्डधारकांना BHIM अॅपद्वारे सहज कार्ड टॉप-अप करता येणार असून, यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे.

MSRTC प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता BHIM App द्वारे करता येणार NCMC कार्ड टॉप-अप
Bhim App

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर घातली आहे. आता NCMC कार्डधारकांना BHIM App च्या माध्यमातून आपल्या कार्डचे टॉप-अप करता येणार आहे. 15 सप्टेंबर 2026 पासून BHIM App द्वारे NCMC कार्ड टॉप-अपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  नक्की वाचा: सक्तीचे केलेले NCMC Card अवघ्या काही दिवसांतच अडचणीत, ST ने घेतला यू-टर्न 

काय आहे नवीन सुविधा?

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या सुविधेमुळे कार्डमधील शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्याच कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.

कोणाला होणार फायदा?

NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या NCMC कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे या प्रवासी वर्गाला अधिक गतिमान आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

सुविधेचा वापर कसा करायचा?

ही सुविधा वापरण्यासाठी NCMC कार्डच्या पाठीमागील QR कोड BHIM अ‍ॅपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉप-अप करता येईल. यामुळे प्रवाशांना NCMC कार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम तत्काळ जमा करण्याची सुविधा मिळणार आहे.

डिजिटल सेवांना मिळणार बळ

एसटी महामंडळाच्या डिजिटल प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि अधिक गतिमान प्रवास हा उद्देश यामुळे साध्य होणार आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी NCMC कार्डचा वापर अधिक सुलभ होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2026 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).