MSRTC Employee Strike: मुंबई कडे येणार्‍या संपकरी एसटी कर्मचार्‍यांना टोल नाक्यावरून पोलिस घेत आहेत ताब्यात

राज्याच्या इतर भागातूनही कर्मचारी मुंबईकडे येत आहेत पण पोलिसांकडून आज विविध ठिकाणी कारवाई करत मुंबई मध्ये पोहचण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचार्‍यांचा (MSRTC Employee) प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. सध्या राज्यात एसटी कर्मचारी अजूनही संप करण्याच्या भूमिकेवर कायम आहे. सध्या आपल्या मागण्या रेटून धरणारे कर्मचारी मुंबई मध्ये आझाद मैदानात (Azad Maidan) आहे. टोल नाक्यांवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून एसटी कर्मचार्‍यांना वेशीवरच रोखले जात आहे. नक्की वाचा: MSRTC Workers Strike: मागण्या दुर्लक्षित राहिल्यास MSRTC आंदोलन तीव्र करू, रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा इशारा .

एसटी कर्मचारी मागील 11 दिवसांपासून मुंबईत आझाद मैदान मध्ये आंदोलनाला बसले आहेत. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलिगीकरण करावे या मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. ही आमच्यासाठी अंतिम लढाई आहे, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही. तसेच एसटीच्या खाजगीकरणाला आमचा विरोध असेल अशी त्यांची ठाम भूमिका आहे. दरम्यान एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री अनिल परब यांनी खाजगीकरण केवळ एक पर्याय आहे. अद्याप त्यावर सरकारने निर्णय घेतलेला नाही असं सांगत आंदोलन मागे घेण्याची भूमिका मांडली आहे.

दरम्यान आंदोलक संपकर्‍यांवर एसटीने कारवाई देखील सुरू केली आहे. काल पर्यंत 238 रोजंदारीवर काम करणार्‍यांना कामावरून काढण्यात आले आहे तर 297 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. आतापर्यंत 2296 रोजंदारीवर काम करणार्‍यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये 238 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते.