Maharashtra Board 10th Result Date: महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल 8 जून रोजी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर होणार जाहीर; बोर्डाकडून अधिकृत माहिती
SSC Results 2019 (Archived, edited, representative images)

MSBSHSE 10th Std Results 2019 Date : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 28 मे रोजी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांनाही दहावीच्या निकालाची प्रतिक्षा होती. मात्र विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या वेगवेगळ्या तारखांमुळे विद्यार्थी-पालकांचा गोंधळ उडाला होता. अखेर अफवांवर विश्वास ठेवू नका, असा संदेश बोर्डाने जाहीर केला.

आता मात्र विद्यार्थी-पालकांची ताणलेली उत्सुकता, आतुरता, हुरहूर संपणार आहे. उद्या म्हणजेच 8 जून रोजी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बोर्डाने दिली आहे. विद्यार्थी हा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर चेक करु शकतात. तसंच विद्यार्थी खालील या तीन वेबसाईटवरही निकाल पाहू शकतात.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट्स:

exametc.com

examresults.net

indiaresults.com

निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी काही सोप्या स्टेप्स:

# महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.

# Latest Notification section खालील MAH SSC 2019 Result या लिंकवर क्लिक करा.

रिल्झट लॉग इन पेज ओपन होईल.

# त्यानंतर हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन समिट बटणावर क्लिक करा.

# निकाल स्क्रिनवर दिसेल.

# तसंच तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा निकालची प्रत सेव्ह करु शकता.

राज्यात यंदा 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यात एकूण 4 हजार 874 परीक्षा केंद्रांवर 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा पार पडली.