मध्य रेल्वेने मुंबई लोकल चालविणा-या मोटरवुमनचा फोटो शेअर करून प्रवाशांना दिला महत्त्वाचा संदेश
मनिषा म्हस्के घोरपडे यांनी चेह-याला शिल्ड आणि मास्क लावून रेल्वेने चालवताना दिसत आहे. सीएसएमटी-पनवेल असणा-या या रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये येणारे कर्मचारी आहेत.
मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करत अनलॉक 1 (Unlock 1) सुरु करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सुविधांसह अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणा-या कर्मचा-यांसाठीच मुंबई लोकल सेवा (Mumbai Local) सुरु करण्यात आली आहे. आज सीएसएमटी-पनवेल (CSMT-Panvel) ही मुंबई लोकल एका महिला मोटरवुमनने चालविली. सौ. मनिषा म्हस्के घोरपडे (Mrs. Manisha Mhaske Ghorpade) असे या महिलेचे नाव आहे. म्हणून या महिलेचा रेलेवे चालवतानाचा फोटो मध्य रेल्वेने (Central Railway) ट्विटरवर शेअर करुन प्रवाशांना महत्त्वाचा संदेश दिला.
या फोटोमधील रेल्वे चालविणा-या महिला सौ. मनिषा म्हस्के घोरपडे यांनी चेह-याला शिल्ड आणि मास्क लावून रेल्वेने चालवताना दिसत आहे. सीएसएमटी-पनवेल असणा-या या रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये येणारे कर्मचारी आहेत. Mumbai Local Trains Update: मुंबई लोकल सेवा आजपासून पुन्हा सुरु, केवळ 'या' प्रवाशांना मुभा; पहा मध्य आणि पश्चिम रेल्वेचे सूचनावली व वेळापत्रक
या महिलेचा फोटो मध्य रेल्वेने शेअर करुन मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित राहा, सतर्क राहा असेही मध्य रेल्वेने या पोस्टखाली म्हटले आहे.