IPL Auction 2025 Live

MPSC Mains Final Result 2019: राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर; mpsc.gov.in वर पाहता येणार निकाल, कट ऑफ, मेरिट लिस्ट

विद्यार्थ्यांना निकाल mpsc.gov.in येथे पाहणार आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना एपीएससीच्या या अधिकृत संकेतस्थळावरुन निकाल पाहण्यासह तो डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

MPSC State Service Mains Final Result 2019: महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोग यांनी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना निकाल mpsc.gov.in येथे पाहणार आहे.  तर परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना एपीएससीच्या या अधिकृत संकेतस्थळावरुन निकाल पाहण्यासह तो डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे. या परीक्षेत राज्यातून प्रसाद चौगुले याचा प्रथम क्रमांक आला आहे. तर मुलींमध्ये पर्वणी पाटील हिने बाजी मारली आहे. एमपीएससीची मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै दरम्यान घेण्यात आली होती.(MPSC Exams 2020 Revised Time Table: राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला; mpsc.gov.in वर पहा नवं वेळपत्रक!)

एपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्यातील एकूण 6825 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यामधून 1326 विद्यार्थी मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. त्यामधील 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जर पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा असल्यास त्यांनी निकाल लागल्यानंतरच्या 10 दिवसाच्या आतमध्ये ऑनलाईन पद्धतीने करावा असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र याच दरम्यान आता एपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांची राज्य सेवेची पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले होते की, कोरोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेता आयोगातर्फे आयोजित करण्यात येणारी कक्षा II ची परीक्षा आणि इंजिनिअरिंग प्राथमिक परीक्षेसह अन्य विविध परीक्षांच्या तारखांबाबत विचार करण्यात येत आहे. तसेच या परीक्षा सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.