Pune: एका व्यक्तीच्या घरातून 127 किलोहून अधिक गांजा जप्त, पुणे पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात
त्याच्या घरी 127 किलोपेक्षा जास्त गांजा सापडला होता.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अमली पदार्थाच्या (Drugs) गुन्ह्यात वाँटेड असलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी (Pune Police) शुक्रवारी अटक (Arrest) केली. त्याच्या घरी 127 किलोपेक्षा जास्त गांजा सापडला होता. कैलास साहेबराव पवार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पेरणे, पुणे येथील वडेबोल्हाई रस्त्यालगत दगडवस्ती डोंगरगाव परिसरात राहणारा आहे. या व्यक्तीकडे 127.765 किलो गांजा सापडला असून त्याची किंमत अंदाजे ₹ 25,75,300 आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे अमली पदार्थांसह 50,600 रुपये रोख, टोयोटा कोरोला कार आणि एक फोनही सापडला आहे. हेही वाचा Devendra Fadnavis On Shivsena: किरीट सोमय्या शिवसेनेच्या भष्टाचाराचा पर्दाफाश करतात म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणे येथील त्याच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये ड्रग्ज लपवून ठेवलेले आढळले. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 चे कलम 8(c), 20(b), ii(c) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाअंती पोलिसांना आढळून आले की हा माणूस दहशतवादविरोधी पथकाने नोंदवलेल्या ड्रग्जच्या गुन्ह्यात हवा होता.