Maharashtra Monsoon Update: पुढील 2 दिवसात महाराष्ट्रातून पाऊस माघार घेण्याची शक्यता, येत्या 48 तासांत उत्तरेकडून पाऊस परतीच्या वाटेवर- IMD

तर संपूर्ण देशातून येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस माघार घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

Maharashtra Rains Update: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. अनेक शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले. अनेक गावे पाण्याखाली गेली. मात्र मागील 2 दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असल्याने शेतक-यांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यातच एक दिलासादायक गोष्ट समोर येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD), पुढील 48 तासांत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून पावसाची माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच येत्या 2 दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांतून पाऊस माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ही माहिती दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 2 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून पाऊस परतीच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण देशातून येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस माघार घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Package For Maharashtra Farmers: अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलेल्या 10 हजार कोटींच्या मदत पॅकेजचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत

आज पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाचा शिडकाव झालेला नाही. तसेच यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला पडल्याने तितकची चांगली थंडी यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला अनुभवता येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी, शेतक-यांसाठी 10,000 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार हे या आपत्तीजन्य परिस्थितीत शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले आहे.