Monsoon Rain 2022: कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटांवर फेणी, मान्सूनची चाहूल; महाराष्ट्रात पर्जन्यवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला आहे. हा मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कोकण किनारपट्टीवर तर मान्सूनची चाहूलही (Signs of Monsoon in Konkan) लागली आहे.
मान्सून (Monsoon 2022) भारतात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला आहे. हा मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कोकण किनारपट्टीवर तर मान्सूनची चाहूलही (Signs of Monsoon in Konkan) लागली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीतून मान्सून येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर दाखल होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाने माहिती देताना म्हटले आहे की, मान्सून तळकोकणात 2 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि कोकणच्या समुद्रकिनारपट्टीवर फेसाळत्या लाटा उसळल्या आणि त्या फेसांचे लोट किनाऱ्यावर धडकू लागले की समजायचे ही मान्सूनची चाहूल आहे. लाटांसोबत येणाऱ्या फेसाला कोकणात फेणी असे म्हणतात.
स्थानिक मच्छिमारांनी नोंदवलेले निरीक्षण असे की, समुद्रात वारे दक्षिणेला वाहायला लागले आहे. समुद्रावर फेणीही यायला सुरुवात झाली आहे. या घडोमोडी म्हणजे मान्सूनची चाऊल आहे. यंदा नेहमीपेक्षा काही काळ लवकरच मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा विदर्भातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर हवामान विभागाने तसा अंदाजही वर्तवला आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: अंदमानात आज मान्सून दाखल होण्याचा अंदाज; कोल्हापूर ते लातूर या 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट)
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा चढा राहिला आहे. वाढत्या तापमानासोबतच काही भागांत मात्र जोरदार पाऊस पडतो आहे. महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रामुख्याने हा पाऊस 17 ते 19 मे या काळात अपेक्षीत असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 13 जिल्ह्यांना हवामान विभागाे यलो अलर्ट जारी केला आहे.