Monsoon Illness in Mumbai: पावसाळी आजारांनी मुंबईकर त्रस्त; मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस , गैस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यूचे रुग्ण वाढले

आगोदरच कोराना व्हायरस आणि कोरोना निर्बंधांच्या कचाट्यात सापडलेल्या मुंबईकरांना या पावसाचा दुहेरी सामना आता साथींच्या रोगांच्या (Monsoon Illness in Mumbai) रुपात करावा लागतो आहे.

Mosquito | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

जुलै महिन्यात मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. आगोदरच कोराना व्हायरस आणि कोरोना निर्बंधांच्या कचाट्यात सापडलेल्या मुंबईकरांना या पावसाचा दुहेरी सामना आता साथींच्या रोगांच्या (Monsoon Illness in Mumbai) रुपात करावा लागतो आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे मान्सून हंगामात येणाऱ्या साथीच्या रोगांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात ही वाढ जवळपास दुपटीने होताना दिसत आहे. प्रामुख्याने या आजारामध्ये मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) , गैस्ट्रोएन्टेरिटिस (Gastroenteritis), डेंग्यू (Dengue ) आणि इन्फ्लूएन्झा H1N1 (Nnfluenza H1N1) यांसारख्या आजारांचा समावेश आहे.

मुंबईत जून महिन्याच्या तुलैनेते जुलै महिनन्यात मलेरिया रुग्णांची संख्या वाढली आहे. जून महिन्यात 357 असलेले मलेरिया रुग्ण जुलै महिन्यात 557 इतके झाले आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू, एन्फ्लूएन्जा यांसारख्या आजार आणि आजारांची लक्षणे घेऊन दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने ही वाढ ई (भायखळा, माझगाव), जी दक्षिण (प्रभादेवी) आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये झालेली पाहायला मिळते. महापालिका अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रेयत म्हटले आहे की म्हणने असे की, मेट्रो बांधकाम साइटवर पावसाचे पाणी साठल्याने प्रजनन वाढण्यास हातभार लागला. (हेही वाचा, Mahad Flood: महापूरातून सावरणाऱ्या महाड शहरासमोर साथीच्या आजारांचे आव्हान, प्रशासनाकडून आरोग्य तपासणीचे अवाहन)

शहरामध्ये काही ठिकाणी डेंग्युच्या रुग्णांचीही वाढ झाली आहे. परंतू, साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या आजाराच्या रुग्णांची वाढ नेहमीच होते. या काळात पाऊस पडतो. त्यामळे डासांपासून होणारा हा आजार बळावतो. या काळात साचलेल्या पाण्यावर डास आपले प्रजोत्पादन वाढवतात. त्यामुळे डासांचे प्रजोत्पादन वाढले की, डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ होते.

एन्फ्लूएन्झा H1N1 आजाराची साधारण 21 रुग्ण शहरात आहेत. इन्फ्लूएन्झा H1N1 आजाराला स्वाईन फ्लू म्हणूनही ओळखले जाते. विषाणूजन्य असलेल्या या आजाराची सहा प्रकरणे जूनमध्ये आढळली. गेल्या जुलैमध्ये, जेव्हा शहराने साथीच्या आजाराला सामोरे जाण्यास सुरुवात केली, तेव्हा H1N1 चे एकही प्रकरण नव्हते, असेही पालिकेचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.