Monsoon 2022 Updates: भारतामध्ये यंदा पाऊस आठवडाभर आधीचा अंदाज; पहा IMD चं अंदाजपत्र

उत्तरेकडीक वार्‍यांची दिशा देखील यासाठी अनुकूल असल्याची माहिती आयएमडी कडून देण्यात आली आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतात सर्वत्र उन्हाची काहिली वाढत असताना हवामान विभागाने आता एक दिलासादायक बातमी दिली आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार यंदा भारतामध्ये मान्सून अपेक्षेपेक्षा एक आठवडा आधीची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वारे यावर्षी अंदमान आणि निकोबार बेटांवर 15 मे च्या सुमारास धडकून पाऊस पडू शकतो. सोबतच या काळामध्ये नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरातदेखील धडकण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये 1 जूनला बरसणारा नैऋत्य मान्सूनचा पाऊस यावर्षी आठवडाभर आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडीक वार्‍यांची दिशा देखील यासाठी अनुकूल असल्याची माहिती आयएमडी कडून देण्यात आली आहे. त्यामुळेच पुढील पाच दिवसांत अंदमान निकोबार बेटांबर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा:  Monsoon Forecast 2022 : जून महिन्यात मान्सूनची होणार दमदार एंट्री; 98% पावसाचा स्कायमेट चा अंदाज.

के एस होसाळीकर ट्वीट

देशात यावर्षी सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. सर्वाधिक 40 टक्के आहे. विभागनिहाय अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत, प्रामुख्याने मराठवाड्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.