Money Laundering Case मध्ये माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री Sushil Kumar Shinde यांची लेक Priti Shroff, जावई Raj Shroff यांची 35 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त
मेसर्स जिंदल कंबाईन्स प्रायव्हेट लिमिटेट आणि मेसर्स ओरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या प्रीती व राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या लेकीची आणि जावयाची सुमारे 35 कोटींची मालमत्ता ईडीने एका बॅंक फ्रॉडशी निगडीत मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये ताब्यात घेतली आहे. PMLA अंतर्गत कारवाई करताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रीती श्रॉफ (Priti Shroff) आणि जावई राज श्रॉफ (Raj Shroff) यांच्यावर ईडीने जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची मुंबई मधील अंधेरी परिसरातील कमर्शियल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीने कारवाई करताना अंधेरी पूर्व भागात असलेल्या कालेडोनिया या इमारतीमधील प्रीती व राज यांच्या मालकीच्या अंदाजे 10,550 स्क्वेअर फिटच्या दोन कमर्शियल मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपातील जप्ती असून जप्त मालमत्तेची एकूण किंमत अंदाजे 35.48 कोटी इतकी असल्याचं बोललं जात आहे.
DHFL चे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनी PMC बॅंकेमध्ये केलेल्या कर्ज घोटाळ्यावरून त्यांच्या विरोधात मनी लॉडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्येच मेसर्स जिंदल कंबाईन्स प्रायव्हेट लिमिटेट आणि मेसर्स ओरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या प्रीती व राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. HDIL च्या संचालकांचे अपील, संपत्ती विकून पीएमसी बँकेचे कर्जफेड करा.
आरबीआयने नोव्हेंबरमध्ये दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) सोपवले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेकडून DHFL ला दिलेलं 3,688.58 कोटी कर्जाला घोटाळा म्हणून घोषित करण्यात आले आहे. YES बँकेतील घोटाळ्याबाबतही या कंपनीची चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे वाधवान बंधू अटकेत आहेत आणि त्यांची मालमत्ता देखील ईडी कडून जप्त करण्यात आली आहे.