मोबाईलचा स्फोट झाल्याने शेतकरी जखमी
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. तसेच या प्रकरणी शेतात चार्जिंग करण्यास लावलेला फोन अचानक फुटल्याने शेतकरी जखमी झाला आहे.
मुलरीधर लांगडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मुरलीधर यांनी शेतात त्यांचा फोन चार्जिंग करण्यास लावला होता. मात्र काम करताना त्यांच्या फोनवर मिस्ड् कॉल आला होता. त्यावेळी आलेल्या फोनला प्रतिउत्तर देण्यासाठी फोन लावला. इतक्यात त्या फोनचा स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे. तर मुरलीधर यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे.
तसेच मोबाईल योग्य पद्धतीने कसा वापरावा याबद्दल नेहमीच सांगितले जाते. मात्र मोबाईल चार्जिंग होत असताना फोनवर बोलणे हे अयोग्य असल्याचे ही मोबाईल कंपन्यांकडून सांगितले जाते.