MNS Aurangabad Rally: मनसे 1 मे ला औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्यावर ठाम; व्यासपीठ उभारणीच्या कामाला सुरूवात

काल 24 मे दिवशी मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह मनसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सभेसाठी व्यासपीठ बांधण्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे.

MNS| Facebook

मनसे (Maharashtra Navnirman Sena) कडून औरंगाबाद (Aurangabad) मध्ये 1 मे महाराष्ट्र दिनी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. अद्याप या सभेला परवानगी नाही. पण मनसे सभा याच मैदानावर घेण्यावर ठाम असून मनसैनिकांनी व्यासपीठ पुजून स्टेज उभारणीच्या कामाला सुरूवात केली आहे.

मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे मागील आठवड्यातच औरंगाबाद मध्ये दाखल झाले आहेत. काल 24 मे दिवशी मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह मनसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सभेसाठी व्यासपीठ बांधण्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे.

मीडीया रिपोर्ट नुसार, मनसेच्या सभेला काही संघटनांकडून विरोध होत आहे. दरम्यान पोलिसांकडूनही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेण्याऐवजी इतर जागांचे पर्याय सुचवले जात आहेत. पण मनसेने आता थेट व्यासपीठ बांधायला सुरूवात केल्याने ते याच मैदानावर ठाम असल्याचं चित्र आहे.Bacchu Kadu On Raj Thackeray: भोंग्याच्या राजकारणावरुन बच्चु कडू यांची राज ठाकरेंवर टीका .

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी मुंबई, ठाणे शहरात झालेल्या सभांमध्ये मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाईल असे आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत निर्णय औरंगाबाद पोलिस आयुक्त घेतील असे नमूद केले होते. दरम्यान आज भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटम बाबत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्यामध्ये मनसे कडून नितीन सरदेसाई, बाळा नंदगावकर, संदीप देशपांडे हजेरी लावणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif