Mumbai: मराठी गाणी न वाजवल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांची हॉटेल व्यवस्थापक आणि डीजेला मारहाण

त्यानंतर कर्मचार्‍यांनी मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केली त्यांनी हस्तक्षेप करून हॉटेल आणि डीजेच्या कर्मचार्‍यांना मारहाण केली.

MNS Flag (Photo Credit: Twitter)

बुधवारी रात्री एका कार्यक्रमात मराठी गाणी न वाजवल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांच्या गटाने वाशी (Vashi) येथील हॉटेलमध्ये व्यवस्थापक आणि डिस्क जॉकी (DJ) यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या गेट टुगेदरदरम्यान कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी डीजेला मराठी गाणी वाजवण्याची मागणी केली तेव्हा ही घटना घडली.

मात्र, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी गाणी वाजवण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर कर्मचार्‍यांनी मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार केली त्यांनी हस्तक्षेप करून हॉटेल आणि डीजेच्या कर्मचार्‍यांना मारहाण केली. त्यानंतर मराठी गाणी वाजवली. मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असली तरी अद्याप याप्रकरणी पोलिसात तक्रार झालेली नाही. हेही वाचा Mumbai Cyber Crime: लोकांच्या वैयक्तिक डेटासह वेबसाइट चालवल्याप्रकरणी दोन भावांना अटक, मुंबई क्राइम ब्रँचची कारवाई

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे म्हणाले, वाशी येथील एका हॉटेलमध्ये गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कंपनीचे कर्मचारी मराठी गाणी वाजवण्याचा आग्रह धरत होते. पण मॅनेजर आणि डीजे दोघांनीही नकार दिला. तक्रार मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन सुरुवातीला हात जोडून विनंती केली आणि नंतर आवाज उठवून गाणी वाजवली. शहरांमध्ये अशा घटना वाढत आहेत.  महाराष्ट्रात मराठी गाणी वाजवली पाहिजे नाहीतर मनसे आवाज उठवेल.