Jay Malokar Dies: अमोल मिटकरी यांची गाडी फोडणारा तरुण MNS कार्यकर्ता जय मालोकर याचा मृत्यू; सकाळी राडा संध्याकाळी निधन

त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक म्हणजे तो केवळ 28 वर्षांचा होता. आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari) यांचे वाहन मनसे कार्यकर्त्यांनी आज (30 जुलै) सकाळीच फोडले. त्यानंतर पुढच्या काहीच तासात त्याचे निधन झाले आहे.

Jay Malokar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचा कार्यकर्ता जय मालोकार (Jay Malokar Dies) याचे निधन झाले आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक म्हणजे तो केवळ 28 वर्षांचा होता. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari) यांचे वाहन मनसे कार्यकर्त्यांनी आज (30 जुलै) सकाळीच फोडले. धक्कादायक म्हणजे सकाळी झालेल्या राड्यात मालोकर (Jay Malokar) याचा सहभाग असल्याची चर्चा होती. त्यानंतर पुढच्या काहीच तासात त्याचे निधन झाले आहे. आमदाराचे वाहन फोडल्याप्रकरणी पोलीस कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले टाकत असतानाच संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे.

अकोला विश्राम गृहासमोर राडा

पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीला पूर आला. पुराचे पाणी पुणेकर नागरिकांच्या घरात घुसले. या घटनेचा धागा पकडत पुणे येथील एका कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत एक शाब्दिक कोटी केली आणि त्यांना टोला लगावला. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. जी मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. परिणामी संतप्त कार्यकर्त्यांनी मिटकरी यांची गाडी फोडली. मिटकरी हे अकोला विश्राम गृहात दाखल झाले असताना हा प्रकार घडला. या वेळी झालेल्या राड्यात जय मालोकर हे देखील घटनास्थळी होते. दरम्यान, या घटनेनंतर मालोकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना रुग्णालयातदाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Amol Mitkari's Car Vandalized: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची MNS कार्यकर्त्यांकडून तोडफोड; राज ठाकरेंवर केली होती टीका (Watch Video))

उपचारादरम्यान मृत्यू

अकोला विश्रामगृहाबाहेर राडा घडल्यानंतर जय मालोकर याच्या छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्याला हृदयविकाराचा झटका येईल, असे कोणालाही वाटले नव्हते. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनसे विधानसभेच्या 225-250 जागा लढणार - राज ठाकरे यांची घोषणा)

संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जय मालोकर याच्या निधनामुळे आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. तो तरुण होता. त्याचे वय केवळ 28 वर्षे इतकेच होते. अस्वस्थ वाटू लागल्याने आणि छातीत दुखत असल्याने त्याला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी करताना त्याचा ईसीजी काढण्यात आला तेव्हा, त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचे लक्षात आले. त्याला तातडीने एन्जोग्रॉफीसाठी आयसीयूमध्ये नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी आतापर्यंत मला माहिती मिळाली आहे. आमच्या पक्षाचे सरचिटणीस अकोल्याला पोहोचले आहेत. ते कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. मालोकर याच्या निधनाबद्दलचा तपशील लवकरच पुढे येईल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.