मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मात्र, वसई-विरार महापालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना तडीपारीची नोटी बजावण्याता आली आहे.

Avinash Jadhav (Photo Credits-Facebook)

मनसेचे (MNS) ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रश्नांवर आंदोलन केली आहेत. मात्र, वसई-विरार महापालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना तडीपारीची नोटी बजावण्याता आली आहे. त्यानंतर त्यांनी मनसेकडून ठाणे महापालिकेच्या कोविड19 रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असलेल्या मुलींना कामावरून काढल्याप्रकरणी आंदोलन सुरु होते. हे अंदोलन करत असाताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ठाण्यातील अधीनस्थ नायालयाने त्यांना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्व मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन फेटाळला आहे.

या सर्व प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा केली आहे. राज ठाकरे यांची भेट घेऊन निघताना बाळा नांदगावकरांना राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना एक निरोप दिला आहे. राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार, नांदगावकर यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. तसेच अविनाश मै हू ना अशा शब्दांत राज यांनी अविनाश जाधव यांना धीर दिला होता. हे देखील वाचा- सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस सक्षम, त्यांच्यावर विश्वास ठेवा- संजय राऊत

अविनाश जाधव यांना ठाणे अधीनस्थ न्यायालयात घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली होती. त्यामुळे पोलिसांचाही या परिसरात मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला आहे.