राज ठाकरे राळेगणसिद्धी येथे दाखल, अण्णा हजारे यांची भेट घेणार

जनसेवा करण्यासाठी तुम्ही मला हा पुरस्कार दिला आहे. मात्र, जनसेवा करताना आपण मला सहकार्य करत नसाल तर मला हा पुरस्कार नको, असा शब्दांत अण्णांनी सरकारला ठणकावले आहे.

Anna Hazare & Raj Thackeray (File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) हे राळेगणसिद्धी (Ralegan Siddhi) येथे दाखल झाले आहेत. ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे (Senior Social Activist Anna Hazare) हे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेचा अण्णांच्या आदोलनाला पाठींबा आहे. अनेकदा मागणी करुनही आणि त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊनही सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नेमले नाहीत. त्यामुळे अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. अण्णांच्या आंदोलनाचा हा 6 वा दिवस आहे. या पार्श्वभूमिवर राज ठाकरे अण्णांची भेट घेत आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांची भेट घेतल्यावर राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांशीही संवाद साधणार असल्याचे समजते.

अण्णांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. 30 जानेवारीपासून अण्णांनी आंदोलन सुरु केले आहे. अधीक काळ उपोषण केल्यास अण्णांच्या प्रकृतीला धोका पोहोचू शकतो, असा इशारा अण्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे अण्णांच्या प्रकृतीविषयी सर्व स्तरातून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, अण्णांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. पण, अण्णांचे मनपरिवर्तन करत त्यांचे उपोषण मागे घ्यायाला लावण्यात महाजन यांना यश आले नाही. (हेही वाचा, पुरस्कार वापसी: चित्रपट निर्माते अरिबाम श्याम यांनी सरकारविरोधात थोपटले दंड, सरकारला 'पद्मश्री' परत करणार)

दरम्यान, आपल्या मागण्या मान्य करता अन्यथा सरकारने आपल्याला दिलेला 'पद्मभूषण' पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा अण्णांनी केली आहे. जनसेवा करण्यासाठी तुम्ही मला हा पुरस्कार दिला आहे. मात्र, जनसेवा करताना आपण मला सहकार्य करत नसाल तर मला हा पुरस्कार नको, असा शब्दांत अण्णांनी सरकारला ठणकावले आहे. लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची मागणी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत मागण्या पूर्ण झाल्यान नाहीत तर, सरकारद्वारे मिळालेला 'पद्मभूषण' पुरस्कार ते येत्या 8/9 जानेवारीला सरकारला परत करणार आहेत.