MNS On Marathi Signboards on shops: 'मराठी पाट्या लावा अन्यथा..खळखट्याक' मनसे कार्यकर्त्यांचा बॅनरद्वारे मुंबईतील दुकानदारांना इशारा

दुकानांवरील पाट्या मराठीत लावा अन्यथा पुन्हा एकदा खळखट्याक करावे लागेल, असा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरद्वारे दिला आहे.

Marathi Signboards | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक अक्षरांमध्ये मराठी भाषेत (Marathi Signboards) नामफलक लावण्यात यावेत, असे आदेश दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालयानेच आपल्या निर्णयात दिले आहेत. परिणामी राज्यातील दुकानदारांवर हा निर्णय बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक दुकानदारांनी मराठी भाषेत दुकानांवर नामफलक लावले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आक्रमक झाली आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी देण्यात आलेली मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. ज्यासाठी अवघे चार दिवसबाकी आहेत. त्यामुळे हे फलक लवकरात लवकर लावण्या यावेत, अन्यथा पुन्हा खळखट्याक केले जाईल, असा इशारा मनसेने बॅनरच्या माध्यमातून दिला आहे. या बॅनरवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचेही फोटो झळकत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्मरण

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्यातील सर्व दुकाने, संस्था आणि आस्थापनांवरील पाट्या या मराठी भाषेत असाव्यात. त्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंतची मुदत होती. त्याचीच आठवण मनसेने बॅनरच्या माध्यमातून करुन दिली आहे. मनसे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी, सोशल मीडिया मंच एक्स हँडलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''आधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या ह्या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता 5 दिवस उरले. दोन भाषेत पाट्या करण्याची दुकान मालकांची इच्छा असेलच तर देवनागरी लिपीतली मराठी भाषा आधी असली पाहिजे आणि मराठी मधील नाव हे बाकी भाषेतील नावापेक्षा मुळीच छोटं नसलं पाहिजे. संदर्भ: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017.

मनसे एक्स हँडलवरुनही इशारा

दरम्यान, शिदोरे यांनी एक्स हँडलवरुन केलेली पोस्ट मनसेच्या अधिकृत एक्स हँडलवरुन पुन्हा जोडली गेली आहे. ही पोस्ट जोडताना म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात… शेवटचे ४ दिवस.”

मनसे एक्स पोस्ट

मराठी पाट्यांसाठी मनसेचे आंदोलन

दरम्यान, मुंबईतील विविध भागांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बॅनर झळकवले आहेत. या बॅनरवरही दुकानदार, व्यवसायिक आणि आस्थापनांना थेट इशारा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत दुकानांवरील पाट्या मराठीमध्ये करण्यात याव्यात. अन्यथा पुन्हा एकदा खळखट्याक करावे लागेल. मराठी पाट्यांसाठी मनसे पाठिमागील अनेक वर्षांपासून आग्रही आहे. या आधीही मनसेने त्यासाठी विविध आंदोलन केली आहेत. ज्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif