Shivaji Park सुशोभीकरणावरुन मनसे-शिवसेना मध्ये संघर्ष; मैदानात खडी टाकण्यावर मनसेचा आक्षेप
सध्या टाकलेल्या खडीवर माती टाकली जाणार आहे. त्याखाली पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी ग्रव्हल्स टाकले जातील असे बीएमसीने म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये सुशोभिकरणावरून सध्या मनसे-शिवसेना (MNS-Shiv Sena) एकमेकांसमोर भिडताना दिसत आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park) मध्ये बीएमसीने (BMC) रस्ता बनवण्यासाठी खडी टाकल्याने मनसेने त्याला आक्षेप दर्शवला आहे. आज सकाळी मनसेचे नितीन सरदेसाई (Nitin Sardesai), संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), यशवंत किल्लेदार कार्यकर्त्यांसह शिवाजी पार्कमध्ये आले होते. शिवाजी पार्कमध्ये रस्ता बनवण्याच्या कामाला शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. नक्की वाचा: Shivaji Park: छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका- संदीप देशपांडे
महापालिकेच्या स्पष्टीकरणानुसार, शिवाजी पार्कमध्ये कोणताही रस्ता होणार नाही. सध्या टाकलेल्या खडीवर माती टाकली जाणार आहे. त्याखाली पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी ग्रव्हल्स टाकले जातील असे बीएमसीने म्हटलं आहे. शिवाजी पार्क मैदान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान बनवण्याचा पालिकाचा प्लॅन आहे असे त्यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील शिवाजी पार्क परिसराची पाहणी केली आहे. त्यानंतर काल रात्री खडी टाकण्यात आली आहे.
शिवाजी पार्कमध्ये मनसे कार्यकर्ते धरणं आंदोलनं करायला लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिसांनी दूर केले आहे. सकाळी पोलिसांनी संदीप देशपांदे, नितीन सरदेसाई यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये शिवाजी पार्क परिसरात नागरिक, क्लबचे सदस्य आणि खेळाडूंनी या संदर्भात राज ठाकरेंची देखील भेट घेतली आहे.