मनसे पदाधिकाऱ्याने 6 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्याने खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

फोटो सौजन्य - फाइल फोटो

नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्याने खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर मिलिंद खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी 6 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

कामोठेत राहणारे धर्मा जोशी यांनी त्यांच्या घराबाहेरील परिसरात झाडे लावली. मात्र मिलिंद खाडे याला याबाबत कळताच त्याने त्याचे फोटो काढून वृत्तपत्रात याबद्दल माहिती दिली. तसेच सिडकोचे निवृत्त अधिकारी नियम मोडत असल्याचा आरोप करत त्यांची बदनामी करणार अशी धमकी दिली. त्याचसोबत असे करु नये म्हणून 6 लाख रुपयांची खंडणी जोशी यांच्याकडे मागितली. तर जोशी यांनी मी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसतानाही पैसे का देऊ असा सवाल खाडे याच्याकडे उपस्थित केला. त्यामुळे खाडे विरुद्ध जोशी यांनी तक्रार दाखल केली. (हेही वाचा-परळी: अवैध गर्भपात प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, डॉक्टर सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे यांना 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा)

या प्रकरणी पोलिसांनी खाडे याला अटक केली आहे. तसेच 11 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.