Raj Thackeray Speech At Shivaji Park: नवं मराठी वर्ष मोदीमुक्त भारताचं जावो याच गुढी पाडवा शुभेच्छा: राज ठाकरे

जमलेल्या माझ्या मराठी बंधू आणि भगीनिंनो', असे आपल्या खास स्टाईलमध्ये उच्चारत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उपस्थितांनाही त्याला जोरदार प्रतिसाद दिला. आपल्या भाषणात राज ठाकरे जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.

RajThackeray (Photo Credits: File Photo)

MNS Gudi Padwa Rally And Raj Thackeray Speech At Shivaji Park In Mumbai: येणारं नवं वर्ष हे आपणा सगळ्यांना मोदी मुक्त भारताचं जावो याच शुभेच्छा, असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे  (MNS Chief Raj Thackeray) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi)  आणि भाजपवर (BJP) टीका केली. 'जमलेल्या माझ्या मराठी बंधू आणि भगीनिंनो', असे आपल्या खास स्टाईलमध्ये उच्चारत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उपस्थितांनाही त्याला जोरदार प्रतिसाद दिला. आपल्या भाषणात राज ठाकरे जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातील प्रतिमा फेकू अशी

निवडणूक  न लढविण्याबाबत मी आणि माझ्या पक्षाने जी भूमिका घेतली आहे ती देशात तशी परिस्थिती आहे म्हणून घेतली आहे. देशात मोदी, शहाचे सरकार दूर करायला हवे. पंतप्रधान मोदी जर असे वागले नसते तर, आम्ही असा निर्णय घेतला नसता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातील प्रतिमा ही फेकू अशी बनली आहे.

इंटनरेटवर मोदी या शब्दाला समानार्थी शब्द फेकू

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत खोटं बोलतात. इंटरनेटवरही फेकू असा शब्द लिहिला असता त्याला समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो. पाच वर्षात या मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हा माणूस पत्रकारांना का इतका का घाबरतो. लोकांची उभी हायात गेली तरी पंतप्रधान होता आले नाही. मोदींना संधी मिळाली पण त्यांनी भलतंच केलं. किती कामं करु शकला असता हा माणूस. पण काही करु शकला नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

काँग्रेस सरकारच्याकाळातील योजनाच नाव बदलून भाजप आणि मोदी सरकारकडून जाहीर

सत्तेत नसताना ज्या मुद्द्यांना मोदी आणि भाजपने विरोध केला त्याच योजना सत्तेत आल्यानंतर या लोकांनी राबवल्या. आधार, जीएसटीला मोदी आणि भाजपांनी विरोध केला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर याच सरकारने आधार, जीएसटी लागू केले. इतकेच नव्हे तर, या सरकारने काँग्रेस सरकारच्या काळातील योजनांचीच नावे बदलून त्या जनतेसमोर सादर केल्या, असे राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले. राज ठाकरे यांनी या वेळी आपल्या मुदद्यांची पुष्ठी करताना राज ठाकरे यांनी व्हिडिओ क्लिप्सही दाखवल्या.

पाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा (MNS Gudi Padwa Rally) शिवाजी पार्कवर घेतला जातो. या मेळाव्यात मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरुन राज ठाकरे जाहीर भाषण करतात अपवाद वगळता गेली अनेक वर्षे मनसेने ही परंपरा सुरु ठेवली आहे. दरम्यान, सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. राज ठाकरे यांची मनसे लोकसभा निवडणुकीत सहभागी नाही. मनसेचा एकही उमेदवार लोकसभेसाठी उभा नाही. मात्र, तरीही राज ठाकरे राज्यभरात जाहीर सभा घेणार आहेत. अलिकडील काळात राज ठाकरे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्याला भाजपकडून तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमिवर राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता होती.

या आधी झालेल्या मनसेच्या अनेक मेळाव्यांत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप विरुद्ध जाहीर भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांची आक्रमक भाषा आणि तीव्र शब्दांत केलेला हल्ला. यामुळे भाजप विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातूनही जोरदार टीका केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन अनेकदा व्यंगचित्रं काढत पलटवार केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यानी या आधी जाहीर भाषणातून मोदींवर केलेल्या टीकेनंतर भाजपने बारामतीचा पोपट अशी राज यांची संभावना केली. त्यालाही ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मनसे भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठींबा देत आहेत, असा त्यांच्यावर आरोप होतो आहे. या सर्व पार्श्वभूमिवर राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. आजच्या भाषणाने राज ठाकरे यांनी मनसेच्या भूमिकबाबत बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now