Arms Act: संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करा; मनसे कडून नागपूर पोलिसांकडे मागणी
21 एप्रिलला अशाच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी भेट म्हणून मिळालेली तलवार उंचावली होती.
ठाण्यात (Thane) मागील आठवड्यामध्ये झालेल्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उत्तर सभेत (Uttar Sabha) त्यांनी तलवार उंचावल्याचं कारण देत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरूनच आक्रमक झालेल्या मनसेने शिवसेनेच्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील नुकतीच नागपूर (Nagpur) मध्ये एका कार्यक्रमात तलवार उंचावल्याचं सांगत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.
सध्या नागपूर दौर्यावर असलेल्या संजय राऊतांचा विविध ठिकाणी कार्यक्रम, सभा, भेटी सुरू आहे. 21 एप्रिलला अशाच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी भेट म्हणून मिळालेली तलवार उंचावली होती. या प्रकाराची दखल घेत आज नागपूर मधील हुडकेश्वर पोलिस ठाण्यात मनसेने एक निवेदन दिले आहे. मनसेचे विदर्भ सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी संजय राऊतांविरूद्धही आर्म अॅक्टनुसार कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. हे देखील नक्की वाचा: Raj Thackeray यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल; उत्तरसभेत तलवार दाखवल्यामुळे Arms Act अंतर्गत कारवाई .
दरम्यान संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया देताना आपण भेट दिलेली तलवार फक्त वर केली आहे. मी एक लॉ मेकर, खासदार आहे. मला कायदा, नियम ठाऊक आहे असं सांगत विषय धुडकावून लावला आहे.